नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या Income Tax Slab विषयी घोषणा केली. जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली. नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे 17500 रुपये वाचणार आहेत. याशिवाय, नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15 हजारावरुन 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
नव्या करप्रणालीनुसार किती रक्कम भरावी लागणार?
3 लाख रुपये- कोणताही कर नाही
3 लाख ते 7 लाख रुपये- 5 टक्के
7 लाख ते 10 लाख रुपये- 10 टक्के
10 लाख ते 12 लाख- 15 टक्के
12 लाख ते 15 लाख – 20 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न- 30 टक्के
एकीकडे, सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा बदलली तर कर स्लॅब देखील पूर्वीपेक्षा सोपे केले आहेत. दुसरीकडे, जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारला सूट वाढवणे अपेक्षित होत. मात्र, सरकारने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले नाहीत. आता करप्रणालीतील हे बदल करदात्यांच्या पचनी पडणार का? हे बघावे लागणार आहे.
जुन्या करप्रणालीनुसार किती कर भरावा लागणार?
देशामध्ये सध्या जुनी आणि नवी अशा दोन करप्रणाली आहेत. जुन्या करप्रणालीचा विचार करायचा झाल्यास 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लागू आहे. 5 ते 10 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाो. तर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सरसकट 30 टक्के कर भरावा लागतो. जुन्या करप्रणातील 2.50 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर जो कर आकारला जातो ती रक्कम कर परतव्याच्या तरतुदीनुसार परत मिळते. त्यामुळे जुन्या करप्रणालीनुसार बघायला गेल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. नव्या करप्रणालीनुसार 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 5 टक्के कर लागू होतो.