नवी दिल्ली : ऐन सणासुदीत सोने-चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे दिसत आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर राहिला. सलग नऊ दिवसांच्या वाढीनंतर सोन्याने 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. मात्र, चांदीचे भाव कमी झाल्याचे दिसून आले. चांदी 92,500 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.
स्थानिक बाजारात तीन दिवसांपासून वाढत असलेल्या वाढीला पूर्णविराम देत चांदीचा भाव सोमवारी 2,000 रुपयांनी घसरून 92,500 रुपये प्रति किलोवर पोहोचला. गेल्या सत्रात चांदी 94,500 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ (MCX) वरील फ्युचर्स ट्रेडमध्ये, ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याच्या कराराची किंमत 42 रुपयांनी वाढून 74,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 75,720 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 70,009 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 92,300 रुपयांवर गेले आहेत.