मुंबई : सध्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात आता स्मॉलकॅप कंपनी जीनस पॉवरच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ (BSE) मध्ये बुधवारी कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 399.75 रुपयांवर पोहोचला. इतकेच नाहीतर 4 वर्षांत शेअर्समध्ये तब्बल 1255 टक्क्यांची वाढ झाल्याचेही पाहिला मिळाले.
जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्सचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशीही वाढल्याचे दिसून आले. त्यात आता या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपनीचे शेअर्स 500 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस एमकेने जीनस पॉवरचे कव्हरेज सुरू केले आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्सचे शेअर्स गेल्या 4 वर्षांत 1255 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. 9 ऑक्टोबर 2020 रोजी स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 29.45 रुपयांवर होते. 9 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 399.55 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 3 वर्षांत, जीनस पॉवर शेअर्समध्ये 422% वाढ झाली आहे.