मुंबई : शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठी घडामोड पाहिला मिळाली. यामध्ये भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. या कालावधीत भारती एअरटेल, एम अँड एम आणि एचडीएफसी बँकेच्या व्यवहारांमुळे देशांतर्गत निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले.
सोमवारी सकाळी साडेनऊच्यादरम्यान बीएसई सेन्सेक्स 287 अंकांनी वाढून 84,831 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 50,100 अंकांनी 25,891 वर व्यवहार करत होता. बेंचमार्क निर्देशकांनी यूएस अर्थव्यवस्था सामान्य स्थितीत परत येईल, या आशावादाने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यामुळे आता बुधवारी 50 बेसिस पॉइंट्सची भरीव कपात केल्यानंतर Fed आता 7 नोव्हेंबरला व्याजदरात आणखी 50 बीपीएस कपात करू शकते, अशी तज्ञांची अपेक्षा आहे.
सेन्सेक्स समभागांमध्ये भारती एअरटेल, एम अँड एम, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक वाढीसह उघडले. तर आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, पॉवर ग्रिड आणि इन्फोसिसचे भाव घसरल्याचे पाहिला मिळाले.