नवी दिल्ली : एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी ‘टेस्ला’ला (Tesla) भारतात कारनिर्मितीसाठी ‘टेस्ला’ला जानेवारीपर्यंत मिळू शकते मान्यता; आता सरकार घेणार निर्णयभारतात उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी सरकार जानेवारी 2024 पर्यंत सर्व आवश्यक मंजुरी देऊ शकते. यासाठी शासकीय विभाग वेगाने काम करत आहे. एका अहवालात ही माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये टेस्लाच्या गुंतवणूक प्रस्तावासह देशातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या पुढील टप्प्यावर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान कार्यालयात झालेली बैठक प्रामुख्याने सामान्य धोरणात्मक बाबींवर होती. परंतु जानेवारी 2024 पर्यंत देशात टेस्लाच्या प्रस्तावित गुंतवणुकीसाठी जलदगतीने मान्यता देणे हा प्रमुख अजेंडा होता. मस्क यांना भारतात कार निर्मिती आणि बॅटरी साठवण्याचा कारखाना सुरू करायचा आहे. यासाठी कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला आहे. गेल्या वर्षी टेस्लाने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु कंपनी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकली नाही.
पुण्यात असणार ‘टेस्ला’चे कार्यालय
टेस्लाचे भारतातील पहिले कार्यालय पुण्यात सुरू होणार आहे. टेस्लाने (Tesla) भारतात कारनिर्मितीसाठी ‘टेस्ला’ला जानेवारीपर्यंत मिळू शकते मान्यता; आता सरकार घेणार निर्णय ऑफिससाठी पुण्यातील विमाननगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांच्यात गेल्या जूनमध्ये अमेरिकेत भेट झाली होती. या बैठकीनंतर आयटी मंत्रालय टेस्ला भारतात आणण्यासाठीच्या विविध योजनांबद्दल चर्चा करत आहेत.