मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पापूर्वी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सकारात्मक व्यवहार करताना दिसले. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये मंदी पाहिला मिळाली. त्यानुसार, सेन्सेक्स 73 अंकांनी घसरल्याचे पाहिला मिळाले.
सेन्सेक्स 28.52 (0.03%) अंकांच्या वाढीसह 80,555.17 वर व्यवहार करत होता. तर दुसरीकडे, निफ्टी 17.41 (0.07%) अंकांच्या वाढीसह 24,526.65 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 200 अंकांची वाढ दाखवली तर निफ्टीने 22550 चा टप्पा ओलांडला. पण वरच्या पातळीवरून बाजारात विक्री दिसून आली.
सकाळी बीएसई सेन्सेक्स 127 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला. तर निफ्टी 53 अंकांनी घसरला. त्याचवेळी बँक निफ्टीमध्ये सुमारे 900 अंकांची कमजोरी दिसून आली.