मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कारण, बँकांच्या तुलनेत या शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळण्याची जास्त शक्यता असते. त्यातच आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, या आठवड्यात तीन दिवस शेअर मार्केट बंद असणार आहे.
येत्या आठवड्यात तीन दिवस शेअर मार्केटचे कामकाज बंद राहणार आहे. कारण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन असल्याने या दिवशी सुट्टी असणार आहे. बँका आणि शाळांसोबतच शेअर बाजारही बंद राहणार आहे. याशिवाय, शनिवार आणि रविवारी आठवड्याची सुट्टी असल्याने शेअर बाजार बंद राहणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त बाजार बंद असल्याने इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, एसएलबी, करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह बाजार बंद राहतील.
गुरुवारी सुट्टी असल्याने मधला शुक्रवार फक्त कामकाजाचा असणार आहे. त्यानंतर शनिवार, रविवार नेहमीप्रमाणे सुट्टी असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.