मुंबई : शेअर बाजारात चढउतार पाहिला मिळत आहे. असे असताना मंगळवारी शेअर बाजारात चांगली घडामोड दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. मंगळवारी 30 शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 361.75 (0.44%) अंकांच्या वाढीसह 81,921.29 वर बंद झाला. तर निफ्टी 104.70 (0.42%) अंकांनी झेप घेऊन 25,041.10 वर बंद झाला.
अमेरिकन बाजारातील वाढ आणि परदेशी निधीच्या ताज्या खरेदीमुळे उत्साही, स्थानिक शेअर बाजार मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सने 362 अंकांची तर निफ्टीने 105 अंकांची वाढ नोंदवली. माहिती तंत्रज्ञान (आयटी), दूरसंचार आणि निवडक बँकिंग समभागांमध्ये खरेदीमुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
BSE चा 30 समभागांवर आधारित बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 361.75 अंकांनी वाढून 81,921.29 अंकांवर बंद झाला. हा शेअर 637.01 अंकांनी झेप घेऊन 82,196.55 अंकांवर पोहोचला. NSE चा मानक निर्देशांक निफ्टी देखील 104.70 अंकांनी वाढून 25,041.10 अंकांवर पोहोचला.
‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एनटीपीसी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि अदानी पोर्ट्स वाढीसह बंद झाले. तर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.