मुंबई : शेअर मार्केटमध्ये चढउतार कायम असल्याचे दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी वाढीसह बंद झाले. बँकिंग, पॉवर आणि औद्योगिक शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पाहिला मिळाले. त्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 144.31 अंकांनी वाढून 81,611.41 वर बंद झाला. दिवसभरात तो 535.74 अंकांनी वाढून 82,002.84 च्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला.
भारतीय शेअर बाजारातील NSE निफ्टी 16.50 अंकांनी वाढून 24,998.45 वर बंद झाला. इंट्रा-डे ट्रेडमध्ये तो 152.1 अंकांनी वाढून 25,134.05 च्या उच्चांकावर पोहोचला होता. भारतीय बाजारातील संमिश्र कल असताना गुरुवारी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्रैमासिक निकालांपूर्वी, गुंतवणूकदार अधिक सावधगिरी बाळगताना दिसत आहे. त्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 144.31 अंकांनी वाढून 81611.41 वर बंद झाला. एक्सचेंज डेटानुसार, FII ने बुधवारी 4562.71 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी इंडिया, एनटीपीसी, ॲक्सिस बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश होता. टेक महिंद्रा, सन फार्मास्युटिकल्स, इन्फोसिस, टायटन, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घसरण झाल्याचे पाहिला मिळाले.