मुंबई : शेअर बाजारात आज मोठ्या घडामोडी पाहिला मिळाल्या. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही अस्थिर व्यवहारानंतर लाल निशाण्यावर बंद झाले. मात्र, बाजारात तेजी राहिली. त्यामुळे आज केवळ एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आजच्या व्यवहारात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, धातू, आयटी आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.
रियल्टी शेअर्समध्ये वाढ दिसली तरी तेल आणि वायू, एफएमसीजी आणि युटिलिटी समभागांमध्ये घसरणीचा कल होता. व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 71.77 अंकांनी घसरून 82,890.94 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 32.40 अंकांनी घसरला आणि 25,356.50 वर बंद झाला.
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज (दि.13) वाढून 468.69 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.12) 467.36 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.33 लाख कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसून आले.