मुंबई : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांतील निकाल आज समोर आले आहेत. त्यात हरियाणात भाजपने जोरदार आघाडी घेतली. त्यानंतर लगेचच शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स सुमारे 617.35 अंकांनी उसळी घेत 81,669 वर पोहोचला होता.
विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम पाहिला मिळाला. सुरुवातीला संथ सुरुवात पाहिला मिळाली. त्यानंतर, जसे भाजपने जागा मिळवण्यास सुरुवात केली, तेव्हा सेन्सेक्स-निफ्टीनेही उसळी घेतली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी, सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले, तर दुपारी 1 वाजता हरियाणातील निवडणूक निकाल सत्ताधारी भाजपच्या बाजूने येताच सेन्सेक्सनेही उसळी घेतली.
बीएसई सेन्सेक्स 81,050 च्या आधीच्या बंदच्या तुलनेत घसरणीसह 80,826.56 च्या पातळीवर उघडला होता. मात्र, दुपारी सुमारे 617.35 अंकांनी झेप घेतली होती आणि इंट्रा-डे उच्चांक 81,679 वर पोहोचला होता. दुसरीकडे NSE निफ्टी सेन्सेक्सप्रमाणेच त्याच्या मागील 24,795.75 च्या बंदच्या तुलनेत 24,832.20 च्या स्तरावर उघडल्यानंतर, या निर्देशांकानेही वेग पकडल्याचे पाहिला मिळाले होते.