मुंबई: काल कोसळलेल्या शेयर बाजारानंतर आज भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लक्षणीयरीत्या वाढले आहे. बाजारात व्यापक पातळीवर तेजी दिसून आली, सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात दिसत असल्याने अनेकांच्या जीवात जीव आला आहे. सेन्सेक्स १२०० पेक्षा जास्त अंकांनी वाढला, तर निफ्टी 50 ने वाढून २२,५५० च्या जवळ गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या Reciprocal Tariff च्या निर्णयामुळे शेयर बाजार कोसळले होते. दरम्यान, तब्बल ४ हजार अंकांनी कोसळल्यानंतर आज पहिल्याच सत्रात शेअर बाजारानं तब्बल १२०० अंकांची उसळी घेतली आहे. जागतिक बाजारपेठेत आलेल्या तेजीमुळे अनेकांना फायदा झाला आहे, काही टॉप गेनर्समध्ये टायटन, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स आणि एसबीआय यांचा समावेश होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स हिरव्या रंगात दिसत असून व्यापक पातळीवर तेजी दर्शवत आहे. अमेरिकन बाजारात प्रचंड अस्थिरता होती. त्यामुळे अनेकांना आर्थिक नुकसानींना सामोरे जावे लागले. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे.
बाजारातील तेजी जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या संयोजनामुळे झाली, येत्या काळात बाजाराची तेजी कायम राहील अशी तज्ञांची अपेक्षा आहे. मंगळवारच्या बाजारातील जोरदार पुनरागमनामुळे आशा निर्माण झाली आहे. सोमवारी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये 349 अंकांची घसरण झाली होती आणि तो 37,965.60 वर बंद झाला. NASDAQ कंपोझिट 15 अंकांनी वाढला आणि 15,603.26 वर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 12 अंकांनी घसरून 5,062 च्या पातळीवर बंद झाला.