Waaree Energies IPO : मुंबई : सोलर पॅनल बनवणारी कंपनी वारी एनर्जीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक कागदपत्रे सादर केली आहेत. याआधीही कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये आयपीओसाठी मसुदा दाखल केला होता.
सेबीने जानेवारी 2022 मध्ये त्याला मान्यताही दिली होती पण कंपनीने त्यांनी हा आयपीओ आणला नाही. त्यावेळी कंपनीने आयपीओद्वारे 1350 कोटीचे नवीन शेअर्स जारी करण्याची आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत 40.07 लाख शेअर्सची विक्री करण्याची योजना आखली होती.
वारी एनर्जीजची या आयपीओअंतर्गत 3 हजार कोटीचे नवीन शेअर्स जारी करण्याची योजना आहे. याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत 32 लाख इक्विटी शेअर्स विकले जातील. यापैकी 27 लाख शेअर्स प्रमोटर कंपनी वारी सस्टेनेबल फायनान्सद्वारे (आधीचे महावीर थर्मोइक्विप) विकले जातील.
याशिवाय चांदूरकर इन्व्हेस्टमेंट आणि समीर सुरेंद्र शहाही 5 लाख शेअर्स विकणार आहेत. या कंपनीत प्रमोटर्सचा 72.32 टक्के हिस्सा आहे. ऍक्सिस कॅपिटल, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया, नोमुरा फायनान्शियल ऍडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया), एसबीआय कॅपिटल मार्केट्स, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेज आणि आयटीआय कॅपिटल हे या इश्युचे मर्चंट बँकर्स आहेत.