नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 350 रुपयांनी वधारला आणि 81,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी स्तर गाठला. त्याचवेळी, चांदीच्या किमतीने 1,500 रुपयांच्या उसळीसह प्रति किलो एक लाखाचा आकडा पार केला. ‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशन’ने ही माहिती दिली आहे.
चांदीच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ सुरू राहिली आणि 1,500 रुपयांनी वाढून प्रति किलो 1.01 लाख रुपयांचा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारी चांदीचा भाव 99,500 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. चांदीच्या सतत वाढीचे मुख्य कारण औद्योगिक मागणी आहे. याशिवाय दागिने आणि चांदीच्या वस्तूंच्या सेगमेंटमुळेही वाढ झाली आहे. याशिवाय 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 350 रुपयांनी वाढून 80,600 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. यापुढील काळात सोने-चांदीचे दर आणखीन वाढण्याची शक्यताही जाणकारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 78,480 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 72,630 रुपये झाला आहे. याशिवाय, पुण्यात चांदीचे दर प्रतिकिलो 1.02 लाखावर गेले आहेत.