मुंबई : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी बाजारात प्रचंड वाढ दिसून आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सेन्सेक्स 1200 पेक्षा अधिक अंकांनी तर निफ्टीत सुमारे 400 अंकांची वाढ झाल्याचे पाहिला मिळाले. व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 1241 अंकांच्या उसळीसह 71,941 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 385 अंकांच्या उसळीसह 21,737 अंकांवर बंद झाला. बाजाराच्या बाजार भांडवलात 6 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.
शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 377.13 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 371.28 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.85 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आजच्या व्यवहारात, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसीच्या समभागांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे ऊर्जा निर्देशांक 1820 अंकांच्या किंवा 5.17 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजची घोडदौड आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 6.86 टक्क्यांच्या वाढीसह 2896 रुपयांच्या उच्च पातळीवर बंद झाला. टाटा मोटर्स 3.62 टक्के, पॉवर ग्रिड 3.40 टक्के, लार्सन 3.25 टक्के वाढीसह बंद झाला. आयटीसी 1.20 टक्के, इन्फोसिस 0.89 टक्के, टेक महिंद्रा 0.53 टक्के घसरणीसह बंद झाले.