मुंबई : भारतात दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक बदल केले जातात. त्यात आता नोव्हेंबर महिना संपत आला आहे आणि डिसेंबर सुरु होणार आहे. नवीन महिना आपल्यासोबत अनेक मोठे बदल घेऊन येणार असल्याची शक्यता आहे. याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
1 डिसेंबर 2024 पासून क्रेडिट कार्ड संबंधित बदल केला जाणार आहे. जर तुम्ही डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांसाठी विशेषत: SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून नवीन नियम लागू होत आहेत. SBI कार्ड्सच्या वेबसाइटनुसार, 48 क्रेडिट कार्ड डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाहीत.
तसेच नोव्हेंबर महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. पण आता तेल आणि वायू वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमती सुधारतात आणि यावेळी देखील तेच दिसून येणार आहे. काही काळापासून स्थिर असलेल्या 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत (एलपीजी सिलिंडरची किंमत) सुधारणे अपेक्षित आहे.
OTP साठी करावी लागणार प्रतिक्षा
TRAI ने कमर्शिअल मेसेज आणि OTP शी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्यांनी पाठवलेले सर्व संदेश ट्रेस करण्यायोग्य असतील, जेणेकरून फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील. नवीन नियमांमुळे, ग्राहकांना OTP मिळण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे.