मुंबई : शेअर बाजारात चढउतार कायम आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात ‘अच्छे दिन’ पाहिला मिळाले. सेन्सेक्समध्ये 98 अंकांची वाढ दिसून आली. तर निफ्टी 25350 पार गेल्याचे दिसले. सेन्सेक्सने 83,184.34 चा विक्रमी उच्चांक गाठला. बँकिंग निर्देशांक निफ्टी बँक शुक्रवारपासून 215.10 अंकांनी वाढून 52,153.15 वर बंद झाला.
सध्या निफ्टी 25,445.70 अंकांवर पोहोचला आणि सत्राच्या शेवटी 27 अंकांच्या वाढीसह 25,384 वर बंद झाला. 30 शेअर्सच्या S&P BSE सत्राच्या शेवटी तो 98 अंकांच्या वाढीसह 82,989 वर बंद झाला. 26 समभाग हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित 24 लाल रंगात बंद झाले. NTPC, JSW स्टील, हिंडाल्को इंडस्ट्रीज, श्रीराम फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) यांचा सर्वाधिक फायदा झाला. तर बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि ब्रिटानिया यांचा समावेश होता.
निफ्टी मेटल, निफ्टी रियल्टी आणि निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये 0.61% पर्यंत वाढ झाली आणि निफ्टी एफएमसीजी 0.72% पर्यंत घसरला.16 निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 11 हिरव्या रंगात बंद झाले. तर निफ्टी मीडिया एक टक्का वाढीसह अव्वल कामगिरी करणारा ठरला.