मुंबई : अमेरिकन बाजारात बुधवारी मोठी घसरण झाली होती. यूएस फेडरल बँकेने रात्री उशिरा दर कपातीची घोषणा केली. फेडरल बँकेने दरात 0.25 टक्के कपात केली आहे आणि आणखी दोन कपातीचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्येही मोठी घसरण दिसून आली.
भारतीय शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला, तर निफ्टी 400 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. मात्र, सेन्सेक्स सध्या 917 अंकांनी घसरून 79,238.08 वर व्यवहार करताना दिसून आला. तर निफ्टी 50283 अंकांनी घसरून 23,914.95 वर व्यवहार करताना दिसला. बँक निफ्टी 744 अंकांनी घसरला आहे.
बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअरपैकी दोन वगळता सर्व शेअर्स घसरताना दिसले. सर्वात मोठी घसरण इन्फोसिसच्या शेअर्समध्ये दिसून आली. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 3 टक्के घसरण झाली. तर निफ्टीचे 47 शेअर्स व्यवहार करताना दिसले. त्यात टाटा कंझ्युमर आणि डॉ. रेड्डी यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.