मुंबई : गेल्या चार सत्रांतील सततच्या घसरणीनंतर मंगळवारी (दि.14) शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 169 अंकांच्या वाढीसह 76,499 वर बंद झाला. निफ्टीमध्येही वाढ झाली, तो 90 ने वाढून 23,176 वर बंद झाला. BSE मिडकॅप 902 अंकांनी वाढला.
BSE स्मॉलकॅप 854 वर 51,396 वर बंद झाला. बीएसई मिडकॅपमध्ये मोठी वाढ झाली होती, 902 अंकांच्या वाढीसह 43,297 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 20 वाढले आणि 10 घसरले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 16 घसरले आणि 34 वाढले. तसेच NSE सेक्टरल इंडेक्समध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली. निफ्टी PSU मध्ये म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 4.20%, मेटल 3.98%, मीडिया 2.97% आणि ऑइल अँड गॅस 1.62% ने वाढल्याचे दिसून आले.
NSE च्या डेटानुसार, 13 जानेवारी रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) 4,892.84 कोटी रुपयांचे समभाग विकले. FII च्या तुलनेत, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) या कालावधीत 8,066.07 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यात एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसी यांनी बाजारात आघाडी घेतल्याचे पाहिला मिळाले.