नवी दिल्ली : सध्या अनेक बँका असो किंवा वित्तीय संस्था त्यांच्या पहिल्या तिमाहीतील नफ्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बँकेच्या व्याजातही 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.
2024-25 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्याज 1,11,526 कोटी रुपये होते, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कर्जदाराने नोंदवलेल्या 95,975 कोटी रुपयांपेक्षा 16 टक्के जास्त आहे. भारतीय स्टेट बँकेच्या निव्वळ नफ्याचा हा आकडा 16,786 कोटी रुपयांच्या बाजार अंदाजापेक्षा जास्त आहे.
दरम्यान, समीक्षाधीन तिमाहीत बँकेचे व्याज 1,11,526 कोटी होते, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कर्जदाराने नोंदवलेल्या 95,975 कोटींपेक्षा 16 टक्के जास्त आहे. असे असताना फूड डिलिव्हरी पार्टनर झोमॅटोने मार्केटमध्ये आपला चांगलाच दबदबा निर्माण केल्याचेही पाहिला मिळाले. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोचा नफा वार्षिक आधारावर तब्बल 126 पटीने वाढला आहे.