मुंबई : टाटा शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली असून, समूहाच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 85 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी टाटा ग्रुप लवकरच आणखी एक आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बहुतांश शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये 36 टक्के इतका परतावा दिला आहे. तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 28 टक्के, टाटा केमिकल्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. शिवाय उर्वरित शेअर्समध्येही चांगली तेजी दिसून आली. परिणामी, टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 85 हाजर कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
येत्या दिवसांत टाटा सन्सचा आयपीओ आल्यास त्याची इश्यू साईझ 50 हजार कोटी रुपये असू शकते. टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि इंडिया हॉटेल्स यांची टाटा सन्समध्ये भागीदारी असल्याने टाटा सन्सच्या लिस्टिंगच्या बातम्यांमुळे शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.