नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सलग नवव्यांदा रेपो रेट स्थिर ठेऊ शकते. मध्यवर्ती बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक 6 ऑगस्टपासून सुरू होणार असून, 8 ऑगस्टला याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्थविषयक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अलीकडच्या काही महिन्यांत अन्नधान्य महागाईच्या उच्च पातळीमुळे आरबीआयच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत ऑक्टोबरपर्यंत दर कमी करण्यास वाव नाही. आर्थिक देवाण-घेवाणीत वाढ झाल्यामुळे आरबीआयला सध्याच्या पातळीवर दर राखण्यासाठी वाव मिळेल. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, रेपो रेटमध्ये कपात तेव्हाच होईल जेव्हा आरबीआयला खात्री असेल की महागाईचा दबाव कमी होत आहे किंवा आणखी कमी होऊ शकतो.
जूनमध्ये किरकोळ चलनवाढ 5.1% या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मे महिन्यात तो 4.8 टक्के होता. यासोबतच, सलग 57 व्या महिन्यात महागाई दर आरबीआयच्या चार टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे.