नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने पुन्हा एकदा बँकांवर कडक कारवाई केली आहे. यावेळी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेसह इतर तीन बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध नियामक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बँकांना सुमारे 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरबीआयने भारतीय स्टेट बँक, कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँक या तीन बँकांना दणका दिला आहे. या कारवाईत भारतीय स्टेट बँकेला सर्वाधिक 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने सांगितले. बँकेवर ठेवीदार जागरूकता निधी योजना 2014 च्या काही नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तर सिटी युनियन बँकेला 66 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बँकेवर आरबीआयच्या उत्पन्नाची ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण आणि एनपीए खात्यांशी संबंधित आगाऊ तरतूदी नियमांचे तसेच ‘नो युवर डायरेक्शन’ नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. कॅनरा बँकेवरही काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बँकेला 32.30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे