मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेला चांगला दणका दिला आहे. आरबीआयने या दोन बँकांना 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी ॲक्सिस बँकेला 1.93 कोटी तर एचडीएफसीला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
एचडीएफसी आणि ऍक्सिस या खासगी क्षेत्रातील बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे. या दोन्ही बँकांनी केवायसी, ठेवींवरील व्याजदर आणि शेतीशी संबंधित कर्जाची हमी यांसारख्या नियमांचे पालन केले नसल्याने हा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, टाटा मोटर्सने ई-वाहनांच्या किमती 3 लाख रुपयांनी कमी केल्या आहेत. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांच्या (ई-वाहनांच्या) किमती 3 लाख रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. यामध्ये Nexon EV ची किंमत सर्वाधिक 3 लाख रुपयांनी कमी झाली आहे.
HDFC बँकेला दंड का?
HDFC बँकेनेही काही नियम पाळले नाहीत. यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. ‘ठेवीवरील व्याजदर’, ‘बँकांमधील रिकव्हरी एजंट’ आणि ‘बँकांमधील ग्राहक सेवा’ यावरील काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल HDFC बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.