नवी दिल्ली : सध्या वाढत्या महागाईमुळे घराचं बजेट सांभाळणं चांगलंच कठीण जात आहे. त्यात काहीतरी बचत अर्थात सेव्हिंग व्हावी म्हणून काहीजण कोणत्या ना कोणत्या योजना अथवा स्कीममध्ये पैसे गुंतवतात. पण, तुम्हाला चांगला परतावा पाहिजे असल्यास पोस्ट ऑफिसची एक स्कीम तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. याने घरबसल्या तुम्हाला 20 हजार रुपये मिळू शकतात.
पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (पोस्ट ऑफिस SCSS योजना) खूप लोकप्रिय आहे. ही योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि यामध्ये गुंतवणुकीवर 8 टक्क्यांहून अधिक वार्षिक व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिसमध्ये, प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये बचत योजना चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये सरकारकडून केवळ सुरक्षित गुंतवणुकीची हमी दिली जात नाही, तर अनेक बँकांमध्ये एफडीच्या व्याजदरापेक्षा व्याजदर जास्त आहे. इतकेच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळावे यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये योजना उपलब्ध आहेत.
‘पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम’ ही अशीच एक खास योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून दरमहा 20000 रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. POSSC च्या खात्यात सरकार गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला अर्थात 8.2 टक्के व्याजदर देत आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना देखील नियमित उत्पन्न, सुरक्षित गुंतवणूक आणि कर लाभांच्या बाबतीत खास अशी ठरत आहे.
यामध्ये खाते उघडून तुम्ही किमान 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही पोस्ट ऑफिस योजना निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही व्यक्ती किंवा जोडीदारासोबत जॉईंट अकाउंट उघडता येते.