मुंबई: मध्य-पूर्वेतील संघर्ष वाढल्याने आणि इराणच्या तेल क्षेत्राचे नुकसान झाल्याने तेलाच्या किमती वाढू शकतात, असे एम. के. वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. मध्य-पूर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजारात थोडी चिंता निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता कच्चे तेल ७५ ते ८० डॉलरच्या समान किमतीच्या श्रेणीत व्यवहार करत आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे.
कच्च्या तेलाच्या किमती कमकुवत आहेत, कारण मूलभूत तत्त्वे उच्च तेलाच्या किमतींना समर्थन देत नाहीत आणि इराणमधील तेल क्षेत्रावर कोणतेही मोठे हल्ले झालेले नाहीत. मात्र, दहशतवादी हल्ल्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि इराणच्या तेल क्षेत्राचे नुकसान झाले, तर तेल पुरवठ्यात अडचण येऊ शकते. तेलाचा पुरवठा खंडित झाल्याने तेलाच्या किमती वाढू शकतात, अशी भीती अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
जोपर्यंत पेट्रोलियम उत्पादनांचा संबंध आहे, इराणवर अमेरिकेचे निर्बंध अजूनही आहेत आणि ते आणखी कडक केले गेले आहेत. तत्काळ चिंतेच्या या प्रादेशिक मुद्यांपेक्षा मूलभूत घटक उच्च तेलाच्या किमतींना समर्थन देत नाहीत. ओपेक, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आणि अमेरिकेच्या ईआयए संस्थांच्या अंदाजांनी येत्या वर्षात जास्त तेल पुरवठ्याचे चित्र रंगवले आहे.
हे अंदाज अतिरिक्त पुरवठ्यावर भिन्न आहेत, परंतु त्यांच्यात एक गोष्ट समान आहे की पुरवठा मागणी वाढीपेक्षा जास्त आहे. चीनकडून तेलाची मागणी कमी आहे. गेल्या तीन महिन्यांत हे आणखी स्पष्ट झाले आहे. स्थानिक बाजारपेठेत प्रामुख्याने डिझेल आणि पेट्रोलची कमकुवत मागणी हे यामागचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधील तेल शुद्धीकरणातही गेल्या तीन महिन्यांत घट झाली आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे