पुणे : सगळीकडे देशात यूपीआय ट्रान्सजेक्शनचे प्रमाण वाढले आहे. डिजीटल पेमेंट करताना आपण UPI चा वापर आपण करतो. UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेससंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. UPI मी मुळ कंपनी असणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने आता ऑनलाइन पेमेंट मर्यादा ही तब्बल 5 लाख रुपये केली आहे.
आता हा याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून एनपीसीआयने सर्व यूपीआय अॅप, पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स तसेच बँकांना याबाबत माहिती दिली आहे. सर्वांनी आपल्या सिस्टिममध्ये अपडेट करावे, अशी सूचनाही यूपीआयने केली आहे.
NPCI तर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, UPI मध्ये विशिष्ट श्रेणींसाठी प्रति व्यवहार मर्यादा वाढवण्याची आवश्यकता बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती. हे लक्षात घेता , NPCI ने सर्व बँका, PSPs आणि UPI ॲप्सना ऑनलाइन पेमेंटसाठी काही ठराविक श्रेणींमध्ये व्यवहार मर्यादा वाढवली आहे. तसेच त्यासंबंधी निर्देश दिले आहे.
रुग्णालयाचे बिल, शैक्षणिक संस्थांची फी, आयपीओ आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट स्कीम्स या सारख्या व्यवहारांसाठीही आता 5 लाख रुपयांचे यूपीआय ट्रान्जेक्शन करता येईल. सध्यातरी वर नमूद केलेले व्यवहार वगळता अन्य सर्व प्रकारच्या यूपीआय ट्रान्जेक्शनवर एका दिवसासाठी एक लाख रुपयांची ट्रान्जेक्शन लिमीट आहे.