नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात Nothing ब्रँडचा Nothing Phone 2A हा ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. या फोनमध्ये 50MP चा कॅमेरा आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर बॅटरी 5000 mAH ची दिली गेली आहे.
Nothing Phone 2A मध्ये 50 मेगापिक्सेलचे 2 रियर कॅमेरे दिले आहेत. यात 8GB रॅम असणार आहे. तर 128GB स्टोरेज देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAH ची दमदार बॅटरी आहे आणि ती मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 प्रो प्रोसेसरने चालते. यातील विशेष गोष्ट म्हणजे कंपनी Nothing Phone 3 लाँच करण्याच्या तयारीत आहे. Nothing Phone 2A हा फोन परवडणाऱ्या दरात विकत घेता येऊ शकणार आहे. ऑनलाईन खरेदी केल्यास मोठा डिस्काउंटही दिला जात आहे.
Nothing Phone 2A मध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असेल. हा एक AMOLED डिस्प्ले आहे जो HD गेमिंग सपोर्ट देतो. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन दिले आहे. 1300 निट्सची कमाल ब्राइटनेस देण्यात आली आहे.