नवी दिल्ली: भारतातील कर भरणाऱ्या नागरिकांसाठी कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. हंगामी अर्थसंकल्प सादर करताना टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्यामुळे सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जात नाही.
तसेच आयकर भरण्याची प्रक्रिया ही सुलभ करण्यात आली असून परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे.
दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 लाख कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. तसेच 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. कर दरात कपात केली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल, असंही सीतारामन म्हणाल्या.