मुंबई : भारतीय शेअर बाजारात अनेकदा चढउतार पाहिला मिळतात. त्यातच आज (दि.23) शेअर बाजारात एक नवा विक्रम झाला. सेन्सेक्सने जवळपास 1200 अंकांनी झेप घेतली. तर निफ्टीने पहिल्यांदाच 22900 चा टप्पा पार केला असून, 22,959.7 चा नवीन उच्चांक गाठला.
शेअर बाजारात ही विक्रमी वाढ नोंदवली गेली. या वाढीमागे अनेक कारणे होती. यामध्ये कंपन्यांचे मार्च तिमाहीचे उत्कृष्ट निकाल, आरबीआयद्वारे आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश पेमेंट आणि निवडणुकीचे निकाल बाजाराशी सुसंगत असण्याची अपेक्षा तसेच लार्जकॅप आयटी आणि बँकिंग शेअर्समध्यील खरेदीचा आधार निर्देशांकाला मिळाला. त्यानुसारच, निफ्टीने पहिल्यांदाच 22900 चा टप्पा पार केला आहे.
सेन्सेक्स 75,407.39 या नवीन उच्चांकापर्यंत गेला. त्याच वेळी निफ्टीने सुमारे 1.5 टक्क्यांच्या वाढीसह पहिल्यांदाच 22,900 चा टप्पा ओलांडला आणि 22,959.7 चा नवीन उच्चांक गाठला. बँकिंग क्षेत्रातील शेअर्सच्या जोरदार खरेदीमुळे बाजारातील उत्साह अधिक असल्याचे दिसून येत आहे.