नवी दिल्ली : म्युच्युअल फंड उद्योगाने 2024 या वर्षात शेअर्समध्ये तब्बल 1.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही वाढ प्रामुख्याने किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढलेला आत्मविश्वास आणि शेअर बाजारातील मजबूत कामगिरीमुळे झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
‘ट्रेडजिनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) त्रिवेश डी. यांनी याबाबत सांगितले की, ‘म्युच्युअल फंड भारतीय बाजाराच्या अंतर्गत वाढीच्या क्षमतेला प्राधान्य देत आहे. प्रभावशाली आणि उद्योगातील उदाहरणांमुळे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’मध्ये गुंतवणूकदारांची आवड वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांना सामान्यतः बाजारापासून दूर राहायचे आहे, त्यांनी म्युच्युअल फंडातून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’च्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांनी चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 26,038 कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये 20,155 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. म्युच्युअल फंडांनी मार्चमध्ये 2024 मध्ये सर्वाधिक खरेदी केली आणि या कालावधीत निव्वळ गुंतवणूक 44,233 कोटी रुपये होती. त्यांनी फेब्रुवारीमध्ये 14,295 कोटी रुपये आणि जानेवारीमध्ये 23,010 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती दिली जात आहे.