मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चढउतार पाहिला मिळत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरल्याचे दिसून आले. तर निफ्टी 278 अंकांनी घसरून 24,270 वर आहे. तर निफ्टी बँक 783 अंकांच्या घसरणीनंतर 52532 स्तरावर व्यवहार करताना दिसून आला.
BSE सेन्सेक्सच्या शीर्ष 30 शेअर्सपैकी 29 शेअर घसरत आहेत, तर केवळ 1 शेअर्समध्ये किंचित वाढ होत आहे. भारती एअरटेलचे शेअर्स सुमारे 1 टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वात मोठी घसरण टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि इंडसइंड बँकेत दिसून येत आहे. याशिवाय, हेवीवेट शेअर्सपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 1.33 टक्क्यांनी घसरले आहेत. एसबीआय, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि टायटन या शेअर्समध्येही 1 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
NSE च्या 50 शेअर्सपैकी 47 शेअर्स घसरत आहेत आणि भारती एअरटेल, अदानी एंटरप्रायझेस आणि अपोलोचे 3 शेअर्स तेजीत दिसून आले. 51 शेअर्सनी 52 आठवड्यांची उच्च पातळी गाठली आहे, तर 12 समभाग 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. 39 शेअर्समध्ये अप्पर सर्किट आणि 36 शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे.
या शेअर्समध्ये झाली घसरण…
ग्लेनमार्क फार्माचे शेअर्स 5 टक्के, ज्युपिटर वॅगनचे शेअर 4 टक्के, सेलचे शेअर 5 टक्के, एनएमडीसीचे शेअर 4 टक्के, ओव्हरसीज बँकेचे शेअर 4.30 टक्के, आयआरएफसीचे शेअर 4 टक्क्यांनी घसरले आहेत.