मुंबई : शेअर मार्केटमध्ये चढउतार पाहिला मिळत आहे. काल लोकसभा निवडणुकीदरम्यान शेअर मार्केटमध्ये घसरण पाहिला मिळाली होती. त्यानंतर आता शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले. निफ्टी मिडकॅप 2115 अंकांच्या वाढीसह 51,266 वर बंद झाला आणि स्मॉलकॅप 597 अंकांच्या वाढीसह 16,289 वर बंद झाला.
ऊर्जा, तेल आणि गॅस, आरोग्यसेवा, कंज्यूमर ड्यूरेबल्स एफएमसीजी, बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल यांसारख्या क्षेत्रांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहिला मिळाले. निफ्टी 735 अंकांनी वाढून 22,620 वर बंद झाला आणि सेन्सेक्स 2303 अंकांनी वाढून 74,382 वर बंद झाला. निफ्टी बँक 2126 अंकांनी वाढून 49,054 वर बंद झाला. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले.
बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स वाढीसह बंद झाल्याचे दिसले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली, ज्यामुळे निफ्टी मिडकॅप निर्देशांक 2115 अंकांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक प्रत्येकी तीन टक्के वाढीसह बंद झाले.