नवी दिल्ली : प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Mahindra ने नवी XUV 3XO नुकतीच लाँच केली. ही कार सर्वसामान्यांही खरेदी करता येणार आहे. या कारसाठी दोन लाख रुपये भरल्यानंतर बेस व्हेरिएंट MX2 घरी आणता येईल. याचा हफ्ताही जास्त असणार नाही.
महिंद्राने 8.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत XUV 3XO, MX2 चे दुसरे बेस व्हेरिएंट ऑफर केले आहे. 8.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीशिवाय या किमतीमध्ये 70,930 रुपये आरटीओ, 47,109 रुपयांचा विमा त्याचबरोबर 2,000 रुपयांचे इतर शुल्क यामध्ये समाविष्ट आहे.
जर तुम्ही या वाहनाचा दुसरा बेस व्हेरिएंट MX2 विकत घेत असाल तर बँकेकडून केवळ एक्स-शोरूम किमतीवर कर्ज पुरवठा केला जाईल. अशा परिस्थितीत 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 8.23 लाख रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागेल.
तसेच जर बँक तुम्हाला 8.7 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 8.23 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा केवळ 13,116 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे.