LPG Cylinder Price : दिवाळीनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याला अद्ययावत केले जातात. तेल कंपन्यांनी आज 16 नोव्हेंबर 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. याच महिन्यात नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. मात्र आज पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत तेल कंपन्यांनी 57.50 रुपयांनी कमी असून नवे दर आजपासून लागू केले आहेत.
आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली पासून ते मुंबई पर्यंत एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे ही कपात फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी असून ५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तुमच्या शहरातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती घ्या जाणून.
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवीन दर?
शहर जुनी किंमत नवीन किंमत
दिल्ली १८३३ रुपये १७५५.५० रुपये
मुंबई १७८५.५० रुपये १७२८ रुपये
चेन्नई १९९९.५० रुपये १९४२ रुपये
कोलकाता १९४३ रुपये १८८५.५० रुपये
घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाहीत
- दिल्ली – 903 रुपये
- कोलकाता – 929 रुपये
- मुंबई – 902.50 रुपये
- चेन्नई – 918.50 रुपये