मुंबई : राज्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एलआयसीने आपल्या बँकेतील भागीदारी वाढवली आहे. खुद्द महामंडळानेच आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्येही माहिती दिली आहे. एलआयसीच्या म्हणण्यानुसार, क्यूआयपीद्वारे शेअर वाटपानंतर ही वाढ दिसून आली आहे. या वाढीमुळे ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मधील एलआयसीची भागीदारी 4.05 टक्क्यांवरून 7 टक्के झाली आहे.
स्टॉक मार्केटला मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसीने ‘क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट’ (क्यूआयपी) अंतर्गत, कॉर्पोरेशनला 25.96 कोटी शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे, जे 3.376 टक्के स्टेक आहे. याचे वाटप 57.36 रुपये प्रति शेअर या दराने करण्यात आले आहे.
दरम्यान, या वाटपामुळे एलआयसीची बँकेतील भागीदारी 4.05 टक्क्यांवरून 7.1 टक्के झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर शुक्रवारच्या व्यवहारात 1.4 टक्क्यांनी घसरून 57.66 वर बंद झाला. तर LIC शेअर 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 971 वर बंद झाला.