मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज घसरण दिसून आली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीने (एमपीसी) रेपो रेट स्थिर ठेवले आहेत. त्यातच आरबीआयने महागाईबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी जवळपास एका टक्क्याची घसरण पाहिला मिळाली.
शेअर मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स 581.79 अंकांनी घसरून 78,886.22 वर गेला तर निफ्टी 24,150 च्या खाली दिसून आला. भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठ्या व्याजदरामध्ये आणि नवव्या चलनविषयक धोरणाच्या पुनरावलोकनात कोणतेही बदल केल्याचे दिसून आले नाहीत. दरम्यान, आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली. ही महागाई रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) महागाईबद्दल चिंता व्यक्त केली आणि रेपो रेट 6.50 टक्के इतकाच ठेवला आहे. त्यामध्ये कोणताही बदल केला गेला नाही. याव्यतिरिक्त टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयटीसी, इंड्सइंड बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर फायद्यात दिसून आले.