मुंबई : शेअर बाजारात मोठी घडामोड पाहिला मिळाली. यात आयसीआयसीआय बँक, टायटन आणि एचडीएफसी बँक हेवीवेट शेअर्स निर्देशांक कमकुवत झाल्यामुळे बाजार घसरला. सकाळी 9.20 वाजता सेन्सेक्स 170 अंकांनी घसरून 79,829 च्या पातळीवर आला. दुसरीकडे, निफ्टी 24 अंकांनी घसरून 24,300 च्या जवळ व्यवहार करताना दिसले.
सेन्सेक्स समभागांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टायटन, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआय सर्वात कमजोर झाले. दुसरीकडे, HUL, टाटा मोटर्स, ITC आणि M & M यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले. टायटनचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात चार टक्क्यांपर्यंत घसरले. कंपनीने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या ज्वेलरी व्यवसायात कमकुवत वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांची निराशा झाली.
दरम्यान, जून तिमाहीत JLR ने फॅक्टरी लेव्हलवरील विक्रीत वार्षिक 5% वाढ नोंदवल्यानंतर सुरुवातीच्या व्यापारात टाटा मोटर्सचे शेअर्स 1.5% वाढले. नंतर आयसीआयसीआय बँक, टायटन आणि एचडीएफसी बँक हेवीवेट शेअर्स निर्देशांक कमकुवत झाल्यामुळे बाजार घसरला.