मुंबई : शेअर बाजारात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. गुरुवारी बाजारात चांगली सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार रिकव्हरी झाली. सेन्सेक्स 75,200 च्या वर गेला. तर निफ्टी 22,900 च्या वर पोहोचला आहे. अखेरीस सेन्सेक्स 692 अंकांनी वाढून 75,074 वर आणि निफ्टी देखील 201 अंकांनी वाढून 22,821 वर बंद झाला.
सकाळी सेन्सेक्स 400.42 (0.53%) अंकांच्या वाढीसह 74,744.30 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 122.31 (0.54%) अंकांच्या वाढीसह 22,742.65 वर व्यवहार करत होता. त्यानंतर सुरुवातीच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांच्या वाढीसह 83.41 रुपयांवर व्यवहार करताना दिसला.
दरम्यान, गुरुवारी बाजारातील गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आणि बाजारात तेजी आली. मंगळवारी निवडणूक निकालात भाजपच्या जागा गमावल्यानंतर प्रमुख बेंचमार्क निर्देशांक 6 टक्क्यांनी घसरले होते. मात्र, आता यामध्ये वाढ झाल्याचे दिसले.