मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण झाल्याचे पाहिला मिळाले. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 76922 रुपये होता, जो आता 75377 रुपये प्रति 10 ग्रॅम (दि.21) वर आला आहे. म्हणजेच या आठवड्यात त्याची किंमत 1545 रुपयांनी घसरली आहे.
गेल्या शनिवारी चांदीचा भाव 89976 रुपये होता, तो आता 85133 रुपये प्रति किलोवर आला आहे. अशाप्रकारे, या आठवड्यात त्याची किंमत 4843 रुपयांनी कमी झाली आहे. इतकेच नाहीतर 23 ऑक्टोबरला चांदीने 99,151 रुपये आणि 30 ऑक्टोबरला सोन्याने 79,681 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.
राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 71150 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 77600 रुपये झाला आहे. तर मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 71000 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77450 रुपये झाली आहे. तर कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71000 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 77450 रुपये झाली आहे.