नवी दिल्ली : सध्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहेत. बँकांच्या पारंपारिक पद्धतीत गुंतवणूक करण्यापेक्षा अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. कारण, यातून मिळणारे व्याज आणि फायदा चांगला असतो. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी ट्रेडिंग ॲप्सची माहिती असणे गरजेचे असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा काही अॅप्सची माहिती सांगणार आहोत.
5 Paisa :
5 Paisa एक ट्रेडिंग ॲप आहे. या ऍपच्या माध्यमातून अल्पदरात सुविधा मिळतात. हे ऍप सुलभ इंटरफेससाठी ओळखले जाते. हे ॲप सुरुवातीच्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे.
Upstox :
Upstox हे देखील एक लोकप्रिय ट्रेडिंग ॲप आहे. जे त्याच्या सोप्या इंटरफेससाठी आणि मोबाईल-फ्रेंडली अनुभवासाठी ओळखले जाते. हे ॲप सुरुवातीच्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Grow :
Groww एक गुंतवणूक ॲप आहे. ज्याचा इंटरफेस अगदी सोपा आहे. हे ॲप त्याच्या मोबाईल फ्रेंडली अनुभवासाठी ओळखले जाते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे ॲप चांगला पर्याय आहे.
Zerodha :
Zerodha हे लोकप्रिय ट्रेडिंग ॲप आहे जे त्याच्या कमी फी आणि शक्तिशाली ट्रेडिंग टूल्ससाठी ओळखले जाते. हे ॲप व्यापारी आणि गुंतवणूकदार दोघांसाठी उपयुक्त आहे. याचा फायदाही चांगला आहे.