मुंबई : सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. चांगला परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदारांचा कल जास्त आहे. त्यातच सध्या शेअर बाजार चांगलाच तेजीत आहे. त्यामुळे आता असे काही शेअर आहेत ते खरेदी केल्यास नक्कीच फायदा होऊ शकेल. खुद्द तज्ज्ञांनी काही शेअर्स सुचवले आहेत.
शेअर बाजारतज्ज्ञ पराग शाह यांनी एमसीएक्सची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 2850 रुपये असून, त्यासाठी 3175 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 3,161 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे. तसेच Infosys चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 1665 रुपये असून, त्यासाठी 1585 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 1,647 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 273 रुपये असून, त्यासाठी 246 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 265 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे. याशिवाय, गोदरेज प्रॉपर्टीज शेअर्सची खरेदी करण्याचा सल्लाही पराग शाह यांनी दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 2440 रुपये असून त्यासाठी 2195 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 2,313 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.