India Pakistan Tensions पुणे: भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, एटीएमशी संबंधित एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की देशातील सर्व एटीएम पुढील दोन-तीन दिवस बंद राहतील. खरंतर, व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला आहे की, पाकिस्तानशी जोडलेल्या रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामुळे एटीएम सेवा ब्लॉक होतील. एवढेच नाही तर व्हायरल मेसेजमध्ये वापरकर्त्यांना एटीएमद्वारे कोणतेही व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न असा उद्भवतो की, देशभरातील सर्व एटीएम खरोखरच पुढील दोन-तीन दिवस बंद राहतील का? चला तर मग व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेऊयात…
पीआयबीकडून फॅक्ट चेक…
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या व्हायरल मेसेजची सत्यता पडताळून पहिली आणि तो पूर्णपणे बनावट असल्याचे घोषित केले आहे. पीआयबीने त्यांच्या सत्य पडताळणीत म्हटले आहे की, सर्व एटीएम सेवा सामान्यपणे सुरू आहेत आणि अशा कोणत्याही सायबर हल्ल्याचा धोका नाही. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने लोकांना अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नका आणि ते कोणालाही फॉरवर्ड करू नका, अशी विनंती केली आहे. पीआयबीने पुढे म्हटले आहे की, कोणताही संदेश शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता नक्कीच तपासा.
हा मेसेज कधीपासून व्हायरल होत आहे?
पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा मेसेज व्हायरल होत आहे. गुरुवारी पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक भागांना लक्ष्य केले, त्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआउट लागू करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोर आणि रावळपिंडीसह अनेक पाकिस्तानी भागात ड्रोन हल्ले केले.
Are ATMs closed⁉️
A viral #WhatsApp message claims ATMs will be closed for 2–3 days.
🛑 This Message is FAKE
✅ ATMs will continue to operate as usual
❌ Don’t share unverified messages.#IndiaFightsPropaganda pic.twitter.com/BXfzjjFpzD
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2025
देशभरात एटीएम सुविधा सुरू राहील का?
जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआर सारख्या संवेदनशील भागांसह देशभरात एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. तथापि, पंजाब, हरियाणा, जम्मूमधील सर्व शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर देशातील 25 हून अधिक विमानतळ देखील पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.