मुंबई : नोव्हेंबर महिन्यात Equity Mutual Funds ची गुंतवणूक घटल्याचे समोर आले आहे. या गुंतवणुकीत 14 टक्क्यांनी घट झाली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 35,927.3 कोटी इतकी होती, जी ऑक्टोबरमधील 41,865.4 कोटींच्या तुलनेत 14.1% कमी होती.
या इक्विटी म्युच्युअल फंडातील लार्ज कॅप म्युच्युअल फंडांच्या आवकत 26.3 टक्क्यांची घट झाली आहे, जी ऑक्टोबरमधील 3,452.3 कोटींवरून नोव्हेंबरमध्ये 2,547.9 कोटींवर घसरली आहे. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांमध्ये 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबरमधील 3,772 कोटींवरून नोव्हेंबरमध्ये 4,112 कोटी झाले आहेत. मिड कॅप म्युच्युअल फंडांमध्ये ऑक्टोबरमधील 4,683 कोटींवरून नोव्हेंबरमध्ये 4,883.4 कोटी रुपयांच्या व्यवहारात 4.3 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली.
मासिक म्युच्युअल फंड SIP ने सलग दुसऱ्या महिन्यात 25,000 कोटींचा टप्पा ओलांडला, जो नोव्हेंबरमध्ये 25,320 कोटी होता. तर ऑक्टोबरमध्ये ते 25,323 कोटी होते. SIP अकाउंटची संख्या नोव्हेंबर 2024 मध्ये 10,22,66,590 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे.