नवी दिल्ली : चांगला नफा मिळावा यासाठी गुंतवणूक देखील चांगल्याच ठिकाणी केली जाते. मग ते बँक, शेअर मार्केट असो किंवा सोने खरेदी यातून चांगला परतावा मिळण्याची जास्त शक्यता असते. म्हणून या माध्यमांना प्राधान्य दिले जाते. त्यातच पोस्ट ऑफिस अर्थात भारतीय टपाल खाते देखील कमी नाही. पोस्ट ऑफिसमधील एक अशी स्कीम आहे ती आपल्याला लखपती बनवू शकते.
पोस्ट ऑफिसच्या या स्कीमनुसार, ग्राहकांना दररोज फक्त 95 रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे रिटर्न हजारांमध्ये नसेल तर लाखांमध्ये मिळू शकणार आहे. होय, तुम्हाला 14 लाख रुपये रिटर्न मिळू शकतो. ‘ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतून तुम्ही पैसे गुंतवू शकता. पण तुम्हाला फक्त मॅच्युरिटीनंतरच ते पैसे काढता येऊ शकणार आहे. त्यावेळी तुम्हाला एक-दोन नाहीतर तब्बल 14 लाख रुपये मिळू शकणार आहे.
तसेच या पॉलिसीदरम्यान पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला आणि हप्ते भरायचे राहिले तर या स्कीममध्ये नॉमिनी असणाऱ्याला 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. त्यावेळी किती हप्ते भरले होते यावर ही रक्कम अवलंबून असणार आहेत. त्यामुळे ही एक विशेष अशी योजना ठरू शकते.