मुंबई : भारतीय व्यापार विश्वात अनेक उद्योगपतींचे अस्तित्व आहे. त्यात बांगलादेशमध्ये सध्या राजकीय तेढ निर्माण झाल्याचे पाहिला मिळत आहे. त्यामध्येच अदानी पॉवरने बांगलादेश पॉवर बोर्डाकडे 7000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले आहे. त्याच्या परताव्यासाठी अदानी ग्रुपने जे काही पाऊल उचलले त्यातून त्या ग्रुपला 1450 कोटी रुपये मिळाले आहेत.
बांगलादेशला अदानी पॉवरने कर्ज दिले आहे. मात्र, त्यातील काही रक्कम थकीत आहे. याच थकबाकीबाबत अनेक पत्रव्यवहारही झाला. पण, काहीही फरक पडला नसल्याचे दिसून आले. अखेर अदानी पॉवर झारखंड लिमिटेड (APJL) ने शेजारील देशाचा पुरवठा निम्म्याने कमी केला. त्यानंतर बांगलादेश पॉवर बोर्डाने अदानी पॉवरला सतत वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सुमारे 1450 कोटी रुपयांचे नवीन लेटर ऑफ क्रेडिट (LC) जारी केले आहे.
अदानी पॉवरने वीजपुरवठा अर्ध्यावर आणून पुरवठा बंद करण्याची धमकी दिल्यानंतर बांगलादेश पॉवर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने (BPDB) अदानी पॉवरला दिलेले हे तिसरे क्रेडिट लेटर (LC) आहे. हे क्रेडिट ऑफ क्रेडिट लेटर ऑफ बांग्लादेशच्या कृषी बँकेने दिले आहे. या लेटरनंतर लगेच बांगलादेश सरकारकडून पैशांचा पुरवठा करण्यात आला.