नवी दिल्ली : भारतातील खाजगी क्षेत्रातील बँक अशी ओळख असलेल्या Indusind Bank ने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. या बदलानंतर खातेदारांना बँकेत एफडी केल्यावर 3.50% ते 7.99% पर्यंत वार्षिक व्याज मिळणार आहे. तर बँक ज्येष्ठ नागरिकांना 4% ते 8.49% पर्यंत वार्षिक व्याज देत आहे.
बँकेकडून 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याजदरात बदल करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबरपासून नवे दर लागू झाले आहेत. जर तुमच्याकडे जास्त पैसा असेल आणि तुम्ही एखाद्या बँकेत 10 लाख रुपयांची FD गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या 9 एफडी आणि प्रत्येकी 50,000 रुपयांच्या 2 एफडी एकाहून अधिक बँकांमध्ये गुंतवा. यासह, जर तुम्हाला मधेच पैशांची गरज भासली तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार FD मध्येच तोडून पैशाची व्यवस्था करू शकता. तुमची उर्वरित FD सुरक्षित राहू शकते.
तसेच यापूर्वी बँकांमध्ये त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर व्याज काढण्याचा पर्याय होता. मात्र, आता काही बँकांमध्ये मासिक पैसे काढता येतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते निवडू शकता. FD वर उपलब्ध असलेल्या कर्जाचा व्याजदर देखील तुलनेने कमी आहे. तुम्ही तुमच्या FD वर कर्ज देखील घेऊ शकता. या अंतर्गत, तुम्ही एफडीच्या मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज घेऊ शकता.