नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात बाजार तीन दिवसांसाठी खुला होता आणि तिन्ही दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत असल्याचे दिसून होते. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही प्रचंड वाढ दिसून आली. याशिवाय, बाजारात काही मल्टीबॅगर शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत.
एक स्टॉक शेअर बाजारात चांगली कमाई करताना दिसला. पाच वर्षांत 1500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर शेअरचे नाव हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना सातत्याने जबरदस्त परतावा देत आहे. गुरुवारी शेअर 3.74 टक्के वाढीसह 13169,35 रुपयांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात शेअर बाजार फक्त 3 दिवसांसाठी (मंगळवार, बुधवार आणि गुरुवार) व्यवहारासाठी खुला होता. या तीन दिवसांत मोठी घडामोड दिसून आली. या तीन दिवसांत गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला.
एका वर्षात 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिल्याचे पाहिला मिळाले. या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी त्याची किंमत 8294 रुपये होती. आता ती 13169 रुपये आहे. अशा परिस्थितीत, या शेअरचा एका वर्षाचा परतावा 58.77 टक्के झाला आहे.