नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर ऑनलाईन अर्थात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. हेच डिजिटल व्यवहार वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भारतातील किरकोळ डिजिटल व्यवहार सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट होऊन 2030 पर्यंत 7 हजार ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऑनलाईन खरेदीमध्ये डिजिटल व्यवहारांचा वापर केला जात आहे. ग्राहकांकडून असेच जर सुरु राहिले तर कायमस्वरूपी बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे ऑफलाईन खरेदीलाही चालना मिळेल. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 90 टक्के लोकांनी ऑनलाईन खरेदी करताना डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले. मात्र, श्रीमंत ग्राहकांनी सर्वाधिक डिजिटल पेमेंट वापर केला. असे ग्राहक त्यांच्या 80 टक्के व्यवहारांसाठी विविध डिजिटल पेमेंट पद्धती वापरतात.
‘अॅमेझॉन पे’ने देखील एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये तरुण पिढी सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंट पर्यायांचा अवलंब करण्यात आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघेही त्यांच्या सुमारे 72 टक्के व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंट वापरतात, असेही समोर आले आहे.