मुंबई : गुंतवणूकदारांची संख्या आता वाढत आहे. त्यात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अनेकांचा कल असतो. त्यामुळेच आता जागतिक बाजारपेठेत भारतीय शेअर बाजाराचा डंका पाहिला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला पिछाडीवर टाकत सातव्या क्रमांकावर झेप घेतली.
‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंज’कडून नुकतीच आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या निर्देशांकांनी अनेक विक्रम केले आहेत. मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 377 अंकांच्या घसरणीसह 69,551 पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टीही 95 अंकांनी घसरला. तो 20,906 च्या पातळीवर बंद झाला.
काही दिवसांपूर्वीच बीएसईचे एकूण बाजारमूल्य प्रथमच 4 ट्रिलियन रुपयांवर पोहोचले होते. तर हाँगकाँगचे बाजारमूल्य 3.984 ट्रिलियन डॉलरवर आहे. निफ्टी यावर्षी 16 टक्क्यांनी वाढला आहे. सलग आठव्या वर्षी नफ्याचा आलेख वाढताच आहे. त्यातच जागतिक बाजारपेठेत भारतीय शेअर बाजाराचे नावही होताना दिसत आहे.